कीर्तनाची आवडी मोठा – संत निळोबाराय अभंग – १०८६
कीर्तनाची आवडी मोठा ।
धांवे पाठीं वेष्णवा ॥१॥
जेथें होती नामघोष ।
नाचें उदास ते ठायां ॥२॥
ऐकोनियां आपुली कीर्ति ।
सुखें जगपती सुखावें ॥३॥
निळा म्हणे टाळिया छंदे ।
डुले आनंदे सुप्रेमें ॥४॥
कीर्तनाची आवडी मोठा ।
धांवे पाठीं वेष्णवा ॥१॥
जेथें होती नामघोष ।
नाचें उदास ते ठायां ॥२॥
ऐकोनियां आपुली कीर्ति ।
सुखें जगपती सुखावें ॥३॥
निळा म्हणे टाळिया छंदे ।
डुले आनंदे सुप्रेमें ॥४॥