कर्मे वांटिलीं चहूं वर्णा – संत निळोबाराय अभंग – १०८३

कर्मे वांटिलीं चहूं वर्णा – संत निळोबाराय अभंग – १०८३


कर्मे वांटिलीं चहूं वर्णा ।
क्षत्रिय वैष्य आदि ब्राम्हणा ।
वेदपुरुषा नारायणा ।
गुणविवंचना तुज हातीं ॥१॥
यज्ञ षटकर्मे ब्राहमाणांसी ।
क्षात्रदान क्षत्रियांसी ।
कृषीगोरक्षवाणिज्य वैश्यासी ।
सेवा शूद्रासि याचिते ॥२॥
नामें स्तोत्रें स्त्रियांदिकांसी ।
सेवा वांटिली अधिकारेंसी ।
संतसनकादिक योगियांसी ।
स्वानुभव सिध्दांत दिधले ॥३॥
कथा कीर्तन सकळ लोकां ।
आधिलांपासुनि अनामिकां ।
तरणोपाय विश्वव्यापका ।
केला नेटका विधिमागें ॥४॥
निळा म्हणे ऐसियापरी ।
कृपा करुनियां श्रीहरी ।
जीव तारिले भवसागरीं ।
भक्तकैवारी म्हणोनियां ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कर्मे वांटिलीं चहूं वर्णा – संत निळोबाराय अभंग – १०८३