कथा श्रवणें स्वरुप सिध्दी – संत निळोबाराय अभंग – १०८१
कथा श्रवणें स्वरुप सिध्दी ।
लागे समाधि सात्विका ॥१॥
ऐसा लाभ जोडे जोडी ।
बैसतां आवडे हरिकथे ॥२॥
कथा श्रवणें परिहार दोषां ।
होताति पाशमुक्त पापी ॥३॥
निळा म्हणे हरिकथा श्रवण ।
करी बोळवण जन्ममृत्या ॥४॥