ऐकतां श्रवणीं परमानंद – संत निळोबाराय अभंग – १०७९
ऐकतां श्रवणीं परमानंद ।
उपमर्दे कंद मायेचा ॥१॥
घोशगजरें गजें वाचा ।
जो श्रुतिशास्त्राचा गुह्यार्थ ॥२॥
परम रसाळ मधुराक्षरें ।
चालती सुस्वरें हरिभजनें ॥३॥
निळा म्हणे सुमंगळ।
ऐश्वर्य कल्लोळ प्रेमाचे ॥४॥