आतां अवघे हरिचे जन – संत निळोबाराय अभंग – १०७७
आतां अवघे हरिचे जन ।
करा हो चिंतन नामाचें ॥१॥
देव नुपेक्षील सर्वथा ।
करा कथा कीर्तनें ॥२॥
टाळ मृदंग लावा भेरी ।
नाचा गजरी हरिनामें ॥३॥
निळा म्हणे वैकुंठवासी ।
येती भेटीसी तुमचीये ॥४॥
आतां अवघे हरिचे जन ।
करा हो चिंतन नामाचें ॥१॥
देव नुपेक्षील सर्वथा ।
करा कथा कीर्तनें ॥२॥
टाळ मृदंग लावा भेरी ।
नाचा गजरी हरिनामें ॥३॥
निळा म्हणे वैकुंठवासी ।
येती भेटीसी तुमचीये ॥४॥