संत एकांतीं बैसजे – संत निळोबाराय अभंग – १०७६

संत एकांतीं बैसजे – संत निळोबाराय अभंग – १०७६


संत एकांतीं बैसजे
सर्वही सिध्दांत शोधिले
ज्ञानदृष्टी अवलोकिलें
सारांश काढिलें निवडुनी ॥१॥
तें एक श्रीहरींचे नाम
सकळ पातकां करी भस्म
अधिकारी उत्तम आणि अधम
चारी वर्ण नरनारी ॥२॥
विठ्ठल नामें उच्चार ओंठी
विठ्ठल मूर्ती पाहतां दृष्टी
लाभे ब्रम्हतेची पुष्टी
वाढे पोटीं निज शांती ॥३॥
देखतां कापती त्या काळ
हरिच्या ऐसे अंगी बळ
प्रगटे वैराग्य अढळ
तुटती मळ ममतेचे ॥४॥
महा दोषांची झाडणी
अहंभावादिकांची गाळणी
उभय कुळें बैसवोनि
जाती विमानीं वैकुंठा ॥५॥
ऐसा नामाचा प्रताप
उरों नेदीं पुण्य पाप
भंगूनियां त्रिविधताप
ठाकती सद्रूप होऊनि ॥६॥
दृष्य नुरें त्यांचिये दृष्टी
ब्रम्हानंदें कोंदे
निळा म्हणे धरितां कंठीं
बीजमात्र हरिनाम ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत एकांतीं बैसजे – संत निळोबाराय अभंग – १०७६