हाकेसवें उडी – संत निळोबाराय अभंग – १०७५
हाकेसवें उडी
घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥
ऐसी कृपावंत कोण
माझे विठाईवांचून ॥२॥
करितां आठव
धावोनियां घालि कव ॥३॥
निळा म्हणे गातां
नामें दयावी सायुज्यता ॥४॥
हाकेसवें उडी
घालूनियां स्तंभ फोडी ॥१॥
ऐसी कृपावंत कोण
माझे विठाईवांचून ॥२॥
करितां आठव
धावोनियां घालि कव ॥३॥
निळा म्हणे गातां
नामें दयावी सायुज्यता ॥४॥