नाम वाचे श्रवण कीर्ति – संत निळोबाराय अभंग – १०७४

नाम वाचे श्रवण कीर्ति – संत निळोबाराय अभंग – १०७४


नाम वाचे श्रवण कीर्ति
पाउलें चित्तीं समान ॥१॥
काळ सार्थक केला त्यांनी
धरिला मनीं विठ्ठल ॥२॥
कीर्तनाचा समारंभ
निर्दभ सर्वदा ॥३॥
निळा म्हणे स्वरुपसिध्दि
नित्य समाधि हरिनामीं ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नाम वाचे श्रवण कीर्ति – संत निळोबाराय अभंग – १०७४

View Comments

  • भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमतमयाचे नाव वाचेने सतत घेऊन त्याच परमतत्त्व पांडुरंगाचे श्रवण व किरती कानाने ऐकून सतत चिंतन करीत रहावे व त्या सकल गुन संपन्न षडगुन ऐश्वर्या संपन्न देवाचे समचरण पाउले चिंतातुर साठवून ठेवावी असे जे महान आहेत त्यांनी काळ म्हणजे आपले जीवन च सार्थक करून आपल्या मनी ध्यानी विठ्ठल धरले ला आहे श्रवण किर्तन करीताना निरदंभ कुठलाही मानाभिमान न ठेवता तुकोबा राय ऐका अभंगात सांगितात कि थूंकोनीया मान / दंभ करीतो किर्तन // आसे किर्तन करावे आनी त्या पांडुरंगाचे स्वरूप सिद्ध व नित्य नामात लीन ह्यावे असे संत निळोबा महाराज सांगतात