हेंचि परमार्थाचे सार – संत निळोबाराय अभंग – १०७२

हेंचि परमार्थाचे सार – संत निळोबाराय अभंग – १०७२

हेंचि परमार्थाचे सार
हरीचिया उच्चार नामाचा ॥१॥
जिहीं केला पावले ते
वैकुंठी सरते सुखी झाले ॥२॥
गातां वानितां हरि गुणरासी
झाले त्रैलोक्यासी पूज्य ते ॥३॥
निळा म्हणे निका उपावो
सांपडला ठावो वैष्णवां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

हेंचि परमार्थाचे सार – संत निळोबाराय अभंग – १०७२