हेंचि आम्हांसी गुरुगम्य – संत निळोबाराय अभंग – १०७१

हेंचि आम्हांसी गुरुगम्य – संत निळोबाराय अभंग – १०७१

हेंचि आम्हांसी गुरुगम्य
हरीचें नाम उपदेशिलें ॥१॥
आणिकां साधनीं चाड नाहीं
घालिती अपायीं म्हणोनियां ॥२॥
योगाभ्यास मंत्रजप
पुरश्चरण तप हरिनाम ॥३॥
निळा म्हणे दाविला मार्ग
हाचि हा चांग गुरुनाथें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

हेंचि आम्हांसी गुरुगम्य – संत निळोबाराय अभंग – १०७१

AddThis Website Tools