हाचि उपाव सुगम – संत निळोबाराय अभंग – १०७०

हाचि उपाव सुगम – संत निळोबाराय अभंग – १०७०

हाचि उपाव सुगम सार
तरणें संसार जया नरा ॥१॥
नाम गातां गोविंदाचे
फिटे जीवाचें जीवपण ॥२॥
भुक्ति मुक्ति वोळंगे येती
अंगींचि ठाकती दया क्षमा ॥३॥
निळा म्हणे अवघीच सुखें
येती हिरखें चोजवित ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

हाचि उपाव सुगम – संत निळोबाराय अभंग – १०७०