हरिरुप ध्यानीं हरिनाम वदनीं हरीच्या चिंतनीं तद्रूपता ॥१॥ हरि तयां अंतरी हरि तयां बाहेरी रक्षी निरंतर श्रीहरी त्यां ॥२॥ हरि तयां आसनीं हरि तयां भोजनीं हरि तयां शयनी निद्रा करी ॥३॥ निळा म्हणे हरि देह गेह दारा हरी दुजा वारा लागों नेदी ॥४॥