हरीचें नामचि एक पुरे – संत निळोबाराय अभंग – १०६८

हरीचें नामचि एक पुरे – संत निळोबाराय अभंग – १०६८

हरीचें नामचि एक पुरे
सकळ साधनाचिये धुरें ॥१॥
पावावया वैकुंठासी
लहानथोरां विश्वासीयांसी ॥२॥
न लगे जाणें वनांतरा
सोडोनियां घरदारा ॥३॥
निळा म्हणे वैकुंठीपद
जावया हे संपदा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

हरीचें नामचि एक पुरे – संत निळोबाराय अभंग – १०६८