स्वप्नीं देखिलें तें जागृतीये नाहीं हारपोनियां ठायी ठावोचि नुरे ॥१॥ तेचि परी झाली माझिया मानसा संसारात माशा क्षंणेचि विरे ॥२॥ कैंची हे संपत्ति धन वित्त पशु लटिकाचि आभासु मायीक तो ॥३॥ निळा म्हणे एक सत्य हरीचें नाम येर अवघाचि श्रम मिथ्याभूत ॥४॥