सोडविलीं ऐसी बहुतें – संत निळोबाराय अभंग – १०६५

सोडविलीं ऐसी बहुतें – संत निळोबाराय अभंग – १०६५

सोडविलीं ऐसी बहुतें आयकें
भूतळीं पातकें तरलीं नामें ॥१॥
बोलियेले संत पुराणीं व्याख्यानें
तारिले चिंतनें महापापी ॥२॥
अजामेळ गणिका पौंडिक जरव्याध
नाहीं अपराध विचारिले ॥३॥
निळा म्हणे तोचि धरिला विश्वास
घालुनियां कास नाम गातों ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सोडविलीं ऐसी बहुतें – संत निळोबाराय अभंग – १०६५