सुखें करावें भोजन गर्जावे गुण श्रीहरिचे ॥१॥ ल्यावें लेणें अळंकार असावें सादर हरिकथे ॥२॥ यथाविधी भोगितां भोग ह्रदयीं पांडुरंग आठवावा ॥३॥ निळा म्हणे न लिंपे कर्मा हरिनाम धर्मा अवलंबितां ॥४॥