सांगेल खूण परि हें न कळे । नुघडतां डोळे बुध्दीचे ॥१॥ याचिलागीं चित्तशुध्दी । करा हो उपाधी निरसुनी ॥२॥ दावितांही न दिसे वर्म । ठाके त्या कर्म आड उभें ॥३॥ निळा म्हणे दोषा धुणी । गर्जवा वाणी हरिनामें ॥४॥