नामचिंतनें जडली प्रीती – संत निळोबाराय अभंग – १०६२

नामचिंतनें जडली प्रीती – संत निळोबाराय अभंग – १०६२


नामचिंतनें जडली प्रीती ।
भगवदभावना सर्वभूतीं ॥१॥
हेचि परमार्थ साधन ।
मुखीं नाम ह्रदयीं ध्यान ॥२॥
विषय भोगीं विलोभता ।
मोह न बाधी त्या ममता ॥३॥
निळा म्हणे निजध्यासें ।
झाले मुक्त शुकाऐसे ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नामचिंतनें जडली प्रीती – संत निळोबाराय अभंग – १०६२

View Comments

  • नाम चिंतनात जर तुम्हाला आवड निर्माण झाली. तुम्ही जर देहभान विसरून नामस्मरण करायला लागले आणि तुमच्या मनात समतेची भावना सर्व जीवांविषयी निर्माण झाली की तुम्ही खऱ्या अर्थाने योग्य परमार्थ करत आहात,अस म्हणता येईल. खरा परमार्थ हा देवाच भजन आणि नामस्मरण करणे यातच आहे. जो अशा प्रकारे परमार्थ करतो तो सर्व प्रकारच्या विषयापासून मुक्त होतो. विषयी ,भोगी, विलोभी यांचे विकार संपून जातात. या प्रकाराची भक्ती केल्याने शुक्राचार्य मुक्त झाले आहेत.