सांगितलें संतजनी – संत निळोबाराय अभंग – १०६१

सांगितलें संतजनी – संत निळोबाराय अभंग – १०६१

सांगितलें संतजनी ।
उगवुनी कानीं बिजाक्षरें ॥१॥
विठ्ठल जपतां विठ्ठल होसी ।
न धरीं मानसीं संशय ॥२॥
करीं कीर्तन वाजवी टाळी ।
राहेल वनमाळी हदयांत ॥३॥
निळा म्हणे पडे आटीं ।
साधन संकष्टी आणिकां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सांगितलें संतजनी – संत निळोबाराय अभंग – १०६१