सांगितलें वर्म एवढेंचि करीं । नित्यता उच्चारीं हरिचें नाम ॥१॥ न लगे कोटें जाणें येणें । कर्मबंधनें तुटतील ॥२॥ योगसाधन पवनाभ्यास । न करी सायास अडचणी ॥३॥ निळा म्हणे हरीच्या नामें । चुकती जन्में या प्रहरा ॥४॥