सांगितलें वर्म एवढेंचि – संत निळोबाराय अभंग – १०६०
सांगितलें वर्म एवढेंचि करीं ।
नित्यता उच्चारीं हरिचें नाम ॥१॥
न लगे कोटें जाणें येणें ।
कर्मबंधनें तुटतील ॥२॥
योगसाधन पवनाभ्यास ।
न करी सायास अडचणी ॥३॥
निळा म्हणे हरीच्या नामें ।
चुकती जन्में या प्रहरा ॥४॥