सहजचि नाम आलें वाचे । करीत दोशांचे निर्मूळ ॥१॥ ऐशी व्यास गर्जे वाणी । महिमा पुराणीं विख्यात ॥२॥ पापी चांडाळ दुरात्मे ते । नामेंचि सरते वैकुंठीं ॥३॥ निळा म्हणे गणिका वाल्हा । अजामेळ उध्दारिला गजेंद्र ॥४॥