सकळ मंत्रां वरिष्ठ सार ।
विठ्ठल नाम त्रि अक्षर ॥१॥
वाचे उच्चार करितां जप ।
प्रगटे देहीं विठ्ठल रुप ॥२॥
त्रिविध तापांचेंचि हरण ।
विंठठल नाम उच्चारण ॥३॥
निळा म्हणे सुगम सिध्दि ।
विठ्ठल नामाची समाधी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.