सकळ मंत्रां वरिष्ठ – संत निळोबाराय अभंग – १०५७
सकळ मंत्रां वरिष्ठ सार ।
विठ्ठल नाम त्रि अक्षर ॥१॥
वाचे उच्चार करितां जप ।
प्रगटे देहीं विठ्ठल रुप ॥२॥
त्रिविध तापांचेंचि हरण ।
विंठठल नाम उच्चारण ॥३॥
निळा म्हणे सुगम सिध्दि ।
विठ्ठल नामाची समाधी ॥४॥