विठ्ठल नामें वाहे टाळी । बहमानंदाच्या कल्लोळीं ॥१॥ निजात्मसुखाचा सोहभ । विठ्ठल अवलोकिती डोळां ॥२॥ सकळही सुकृतें ओळलीं । विठ्ठल रुपें उभीं ठेली ॥३॥ निळा म्हणे जडली बुध्दी । नित्य हरिनामें समाधि ॥४॥