विठ्ठल विठ्ठल म्हणतां – संत निळोबाराय अभंग – १०५३

विठ्ठल विठ्ठल म्हणतां – संत निळोबाराय अभंग – १०५३

विठ्ठल विठ्ठल म्हणतां वाचे ।
स्वरुप त्याचें आठवे ॥१॥
शामसुंदर कटीं कर ।
रुप मनोहर तेजस्वी ॥२॥
दिव्य सुमनें तुळसीमाळा ।
मळवट पिंवळा रेखियेला ॥३॥
निळा म्हणे मुगुटावरी ।
खोंविल्या मंजरी कोंवळियां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

विठ्ठल विठ्ठल म्हणतां – संत निळोबाराय अभंग – १०५३