विठ्ठल विठ्ठल वदतां वाणी । चक्रपाणी संतोषे ॥१॥ म्हणोनियां लाहो करा । अहो अवधारा अवघेहि ॥२॥ येणेंचि नामें वैकुंठासी । गेले पापरासी बहु मार्गे ॥३॥ निळा म्हणे सांगती संत । उभवुनी आत पुराणांतरी ॥४॥