विठ्ठल नामाचा प्रताप । लेश उरों नेदी पाप ॥१॥ त्रिविधतापांची बोहरी । विठ्ठल नामाच्या उच्चारीं ॥२॥ दैन्य दु:ख निर्दाळिलें । विठ्ठल नामें ऐसें केलें ॥३॥ निळा म्हणे शांतिसुखें । विठ्ठल विठ्ठल म्हणतां मुखें ॥४॥