विठोबा विठोबा नामोच्चार गोड । सरे येथें चाड सकळिकांची ॥१॥ गात्य आईकत्या एकचि नव्हाभ्र । वैकुंठ राउळीं वसावया ॥२॥ न लगती सायास करणें योगाभ्यास । नाचतां उदास कीर्तनमेळीं ॥३॥ निळा म्हणे जन्म चुके थोडयासाठीं । अच्चारितां ओंठी ऐशी नामें ॥४॥