वाचे उच्चारिलें नाम । ह्रदयीं धरुनियां प्रेम ॥१॥ तेंचि बीज फळा आलें । रुप दृष्टीगोचर झालें ॥२॥ कळासलें ध्यानीं मनीं । दिसे तेंचि जनीं वनीं ॥३॥ निळा म्हणे पंढरीनाथ । अंतरबाह्य जेथें तेथें ॥४॥