वाचे उच्चारिलें – संत निळोबाराय अभंग – १०४९
वाचे उच्चारिलें नाम ।
ह्रदयीं धरुनियां प्रेम ॥१॥
तेंचि बीज फळा आलें ।
रुप दृष्टीगोचर झालें ॥२॥
कळासलें ध्यानीं मनीं ।
दिसे तेंचि जनीं वनीं ॥३॥
निळा म्हणे पंढरीनाथ ।
अंतरबाह्य जेथें तेथें ॥४॥
वाचे उच्चारिलें नाम ।
ह्रदयीं धरुनियां प्रेम ॥१॥
तेंचि बीज फळा आलें ।
रुप दृष्टीगोचर झालें ॥२॥
कळासलें ध्यानीं मनीं ।
दिसे तेंचि जनीं वनीं ॥३॥
निळा म्हणे पंढरीनाथ ।
अंतरबाह्य जेथें तेथें ॥४॥