रानीं वनीं घरीं दारीं । वसतां उच्चारीं हरिनाम ॥१॥ तेणेंचि माया उत्तरोनि घांट । पावसी वैकुंठ सहजवृत्ती ॥२॥ नलगे करणें खटाटोप । करीं हाचि जप नामाचा ॥३॥ निळा म्हणे होईल ऋणी । हा चक्रपाणी तुझा मग ॥४॥