येणेंचि साधनें – संत निळोबाराय अभंग – १०४६
येणेंचि साधनें ।
तुटती संसारबंधनें ॥१॥
म्हणोनियां करा लाहों ।
स्मरा रुक्मादेवी नाहो ॥२॥
येईल धांवतां ।
धावोनियां पाचारितां ॥३॥
निळा म्हणे हरी ।
कृपावंत दीनावरी ॥४॥
येणेंचि साधनें ।
तुटती संसारबंधनें ॥१॥
म्हणोनियां करा लाहों ।
स्मरा रुक्मादेवी नाहो ॥२॥
येईल धांवतां ।
धावोनियां पाचारितां ॥३॥
निळा म्हणे हरी ।
कृपावंत दीनावरी ॥४॥