याचि अनुष्ठानें ध्रुव आणि प्रल्हाद । भोगिताती पद वरिष्ठ तें ॥१॥ जेथें नाहीं होणें निमणें संसारा । काळाचा आडदरा अनोळख ॥२॥ शुका नारदासी हाचि नित्य जप । जिव्हेसी अलाप हरिनामाचे ॥३॥ निळा म्हणे तेहि झाले हरिच्या ऐसें । नाम निजध्यासें महिमा ऐसा ॥४॥