यम नियम प्राणायाम । साधे जपतां रामनाम ॥१॥ रामनाम जपतां आधीं । नाशताती आधिव्याधी ॥२॥ रामनामी जडली वाचा । हरिरुप होय साचा ॥३॥ निळा म्हणे रामनाम । पावलासे मोक्षधाम ॥४॥