भावें पाचारितां । विठ्ठल नामं आळवितां ॥१॥ येसी धांवत धांवत । माउली तूं कृपावत ॥२॥ देसी प्रेम पान्हा । मुखी घालूनियां स्तना ॥३॥ निळा म्हणे घेसी । तया अंकीं खेळविसी ॥४॥