पशु पक्षी श्वापद याती । भृंग पतंग कीटक जाती ॥१॥ हरीतें भजतां हरिरुप झालीं । निजानंदी निमग्न ठेलीं ॥२॥ दैत्य दानव निशाचर । मानव याती नारी नर ॥३॥ निळा म्हणे भजतां हरी । अगाधपणें पावले थोरी ॥४॥