पशु पक्षी श्वापद याती – संत निळोबाराय अभंग – १०४१
पशु पक्षी श्वापद याती ।
भृंग पतंग कीटक जाती ॥१॥
हरीतें भजतां हरिरुप झालीं ।
निजानंदी निमग्न ठेलीं ॥२॥
दैत्य दानव निशाचर ।
मानव याती नारी नर ॥३॥
निळा म्हणे भजतां हरी ।
अगाधपणें पावले थोरी ॥४॥
पशु पक्षी श्वापद याती ।
भृंग पतंग कीटक जाती ॥१॥
हरीतें भजतां हरिरुप झालीं ।
निजानंदी निमग्न ठेलीं ॥२॥
दैत्य दानव निशाचर ।
मानव याती नारी नर ॥३॥
निळा म्हणे भजतां हरी ।
अगाधपणें पावले थोरी ॥४॥