निवैंतरता सर्वांभूतीं । दया शांति आणि करुणा ॥१॥ केली कृपा नारायणें । ऐशीं चिन्हें उमटतां ॥२॥ क्षमा अंगी निर्मत्सर । वाणी उच्चार नामाचा ॥३॥ निळा म्हणे नम्रता अंगी । मोहत्यागी ममतेच्या ॥४॥