निजात्मप्राप्तीलागीं सार । हरीचिया उच्चार नामाचा ॥१॥ हेंचि बीज हेंचि गुज । हेंचि निज निजाचें ॥२॥ ऐसें संती पुरस्कारुनी । सांगितलें कानीं येऊनियां ॥३॥ निळा म्हणे परम प्राप्ती । नामींचि विश्रांति हरीचिया ॥४॥