निजात्मप्राप्तीलागीं सार – संत निळोबाराय अभंग – १०३९
निजात्मप्राप्तीलागीं सार ।
हरीचिया उच्चार नामाचा ॥१॥
हेंचि बीज हेंचि गुज ।
हेंचि निज निजाचें ॥२॥
ऐसें संती पुरस्कारुनी ।
सांगितलें कानीं येऊनियां ॥३॥
निळा म्हणे परम प्राप्ती ।
नामींचि विश्रांति हरीचिया ॥४॥