नामें तारिले पातकी – संत निळोबाराय अभंग – १०३५

नामें तारिले पातकी – संत निळोबाराय अभंग – १०३५

नामें तारिले पातकी ।
मुक्त झाले मृत्युलोकीं ॥१॥
ऐसें बोलियेले वाल्मीक ।
महाभारतीं व्यासादिक ॥२॥
कलियुगीं हरिकीर्तन ।
करितां तरले अधम जन ॥३॥
निळा म्हणे अंसंख्यात ।
हिरच्या नामें झाले संत ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नामें तारिले पातकी – संत निळोबाराय अभंग – १०३५