नामाचेची घोष । करुनि निर्दाळिले दोष ॥१॥ वाट घेण वाल्हा कोळी । अजामेळा पडतां जळी ॥२॥ गणिका आणि पशु गज । प्रल्हाद दैत्याचा आत्मज ॥३॥ निळा म्हणे प्रसिध्द ख्याती । नामापाशी भुक्ति मुक्ति ॥४॥