नामासाठीं वोपी शांति । बैसवी पंगती संताचिये ॥१॥ ऐसा उदार त्रिभुवनीं । नाहीं वांचूनि एका हरी ॥२॥ भुक्ति मुक्ति ज्याचे हातीं । दिव्य संतति भोग सकल ॥३॥ निळा म्हणे देतां न म्हणे । थोर लहानें भाविकें ॥४॥