नामासाठीं वोपी शांति – संत निळोबाराय अभंग – १०३१
नामासाठीं वोपी शांति ।
बैसवी पंगती संताचिये ॥१॥
ऐसा उदार त्रिभुवनीं ।
नाहीं वांचूनि एका हरी ॥२॥
भुक्ति मुक्ति ज्याचे हातीं ।
दिव्य संतति भोग सकल ॥३॥
निळा म्हणे देतां न म्हणे ।
थोर लहानें भाविकें ॥४॥