नामचि एक उच्चारिले । तेही नेले निजधामा ॥१॥ ऐसा याचा कीर्तीघोष । वर्णिती शेष निगमादिक ॥२॥ जिहीं अवलोकिला दिठीं । धन्य सृष्टीमाजीं ते ॥३॥ निळा म्हणे यात्रे येती । ते ते पावती इच्छिलें ॥४॥