नामचि एक विठोबाचें । अवघ्या साधनाचें शिरोरत्न ॥१॥ उच्चार मात्र करितां ओठी । प्रगटे पोटीं हरिरुप ॥२॥ विश्वासचि पाहिजे आधीं । अतंरशुध्दी कारण हें ॥३॥ निळा म्हणे नरवी दोष । हरी नि:शेष जन्ममृत्यु ॥४॥