नामचि एक विठोबाचें – संत निळोबाराय अभंग – १०२९
नामचि एक विठोबाचें ।
अवघ्या साधनाचें शिरोरत्न ॥१॥
उच्चार मात्र करितां ओठी ।
प्रगटे पोटीं हरिरुप ॥२॥
विश्वासचि पाहिजे आधीं ।
अतंरशुध्दी कारण हें ॥३॥
निळा म्हणे नरवी दोष ।
हरी नि:शेष जन्ममृत्यु ॥४॥