नाम तारक हें श्रीहरी । गर्जतां तुमचे भव सागरी ॥१॥ ऐसें जाणोन वैष्णवजन । करिती नित्यनित्य कीर्तन ॥२॥ न लगे तया खटाटोप । नामस्मरणें निरसे पाप ॥३॥ निळा म्हणे बरवी युक्तिी । झाली भाग्यें भविका प्राप्ति ॥४॥