नाना साधनें मंत्र तंत्र । उपासना यंत्र अवघड तें ॥१॥ म्हणोनियां हरिचें । भाविकां सुगम हरिभक्तां ॥२॥ नाहीं आघात प्रायश्चित । वाचा शुचिर्भूत सर्वदा ॥३॥ निळा म्हणे ज्ञान व्युत्पत्ति । कळती निगुती योगाचिया ॥४॥
नाना साधनें मंत्र तंत्र